आ. लंके म्हणतात : कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे!!!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- कोणाचे बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे. बर्हिजी नाईकांची हंगा ही जन्मभूमी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज होती.

मोठ्या गावात मुख्य चौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची समाजाला गरज असुन या समाज व्यवस्थेला विचारांची ही गरज आहे.

त्यामुळे हंगा गावात ही वास्तु उभी राहिल्यानंतर पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात हे अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखविला.

जातेगाव पुणेवाडी व राळेगण सिद्धी नंतर पठार भागातील पाण्यासाठी कान्हुर पठार पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम केले

पाहिजे असेही ते म्हणाले. पारनेर तालुक्यातील हंगा येथे एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, ज्या ज्या समिती कार्यकर्त्यांना मिळाल्या आहेत.

त्यांनी सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की पदांमुळे माणसाला ओळख ‌नाही तर माणसामुळे त्या त्या पदांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या पडला साजेसे काम करून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा, असेही आमदार निलेश लंके म्हणाले .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe