अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात पारनेरचे आमदार निलेश लंके स्वतःला झोकून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.
त्यांचे कोरोना काळातील कार्य उल्लेखनीय असल्याने नगर जिल्ह्यात कोविडची परिस्थिती आटोक्यात यावी यासाठी आमदार लंके यांच्यावर मंत्री म्हणून मोठी जबाबदारी द्या ,
अशी मागणी अकोले येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य मारुतीराव मेंगाळ यांनी केली आहे.
विशेष म्हणजे मेंगाळ हे शिवसेनेचे आहेत. माजी उपसभापती मेंगाळ यांनी म्हंटले की, गेल्या८ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रसह जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
उपचाराअभावी मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक रुग्णांना रेमडेसिवर तसेच ऑक्सीजन बेड भेटत नाही म्हणून रोज जिल्हाभर लोकांना उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत लागत आहे.
जिल्ह्यात ३ मंत्री असताना देखिल नागरिकांना पुरेसा मेडीसिन उपलब्ध होत नाही ,मात्र असे असतांनाही देखिल नगर व पारनेरचे आमदार श निलेश लंके हे कोविड योद्धा म्हणून स्वतःला वाहून घेत आपल्या पारनेरच तालुक्यातील
जनतेच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस एक करून आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवत सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करत आहे.
संपूर्ण जिल्हाभर ऑक्सीजान बेड शिल्लक नाही, रेमडीसिव्हर शिल्लक नाही , मेडीसिन शिल्लक नाही मात्र पारनेरमध्ये आ. लंके यांनी ११०० बेडचे कोविड सेंटर उभ करून महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला आहे .
आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवली आहे.अवघ्या अल्पावधीत आमदार या पदाला न्याय देत लोकनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. कोविड काळात भले भले नेते आपल्या सुरक्षेसाठी घरात बसून स्वतःचे संरक्षण करत आहे.
मात्र ,नगर जिल्ह्यातील हा आमदार स्वतःला झोकून देत जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आहे.
रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षेसाठी कष्ट करत असलेल्या आ.निलेश लंके यांना नगर जिल्ह्यात मंत्री म्हणून मोठी जबाबदारी द्या अवघ्या ८ दिवसात जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येईल असे मारुतीराव मेंगाळ यांनी म्हंटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|