आ. आमदार विखेंच्या प्रयत्नांनी फळउत्पादकांना दिलासा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्­ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत, या माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्­या मागणीची मुख्­यमंर्त्यांनी दखल घेतली असून या योजनेतील जाचक अटी रद्द करण्­याचा निर्णय घेतल्­याने फळपीक उत्­पादकांना दिलासा मिळून या योजनेत सहभाग घेण्­याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्­य सरकारने पुनर्रचीत हवामान आधारित फळ­पीक विमा योजना लागू केली होती; मात्र योजनेतील निकष हे शेतकऱ्यांच्­या नव्­हे, तर कंपन्­यांचे हीत जोपासणारे होते. ही गंभीर बाब आमदार विखे पाटील यांनी ९ मार्च २०२० रोजी मुख्­यमंर्त्यांच्­या निदर्शनास आणून दिली होती.

मागील अर्थसंकल्­पीय आधिवेशनातही या प्रश्­नावर त्­यांनी आवाज उठवून नफेखोरी केलेल्­या कंपन्­यांवर टिकेची झोड उठविली होती. याबाबत राज्­य सरकारने आमदार विखे पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन फळपीक विमा योजनेच्­या निकषात बदल करुन, फळबाग उत्­पादकांना दिलासा देण्­याचा प्रयत्­न केला आहे.

कोरोना महामारीच्­या पार्श्वभुमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कोरोनाचे महासंकट अद्यापही दूर झालेले नाही. निसर्गाच्­या लहरीपणामुळे फळपीकांची जोखीमही वाढली आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता पुनर्रचीत हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्­ये निश्चित केलेल्­या प्रमाणकांचा फेरविचार करुन सुधारित निकष पुन्­हा जाहीर करावेत,

अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी राज्­य सरकारकडे केली होती. फळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्­त होण्­यासाठी निश्चित केलेली प्रमाणके (ट्रीगर) हे वास्­तव हवामान परिस्थितीच्­या विपरीत होते.

ही बाब आमदार विखे पाटील यांनी सरकारच्­या निदर्शनास आणून दिली होती. पूर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. शासनाने नव्­याने लागू केलेल्­या निकषांमध्­ये जास्­त पावसाचे निश्चित केलेले प्रमाणकच योजनेच्­या लाभासाठी फळबाग उत्­पादकांना अडचणीचे ठरणार होते.

शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्­हणून आमदार विखे पाटील यांनी या फळपीक योजनेच्­या संदर्भात केलेल्­या पाठपुराव्­याला अखेर यश आले असून, या योजनेचे निकष बदलण्­याचा निर्णय सरकारने घेतल्­याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्­याचा तसेच नव्­या निकषांप्रमाणे लाभ घेण्­याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe