आ. रोहीत पवार हे दबावाचे व दडपशाहीचे राजकारण करीत आहेत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड बिनविरोध काढले तर कर्जतच्या निवडणुकीत त्यांनी ( आमदार रोहीत पवार) ४५ ठराव असलेले घेऊन गेले पण मतमोजणीत ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजून उमजेना म्हणून जिल्हा बॅंक ट्रेलर आहे तर नगरपरिषदेचा पिक्चर दाखवयाचा आहे असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहीत पवार यांचे नाव न घेता लगावला.

जामखेड येथील केशर लॉन्समध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व नवनिर्वाचित जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार कार्यक्रमात खा. सुजय विखे पा. बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी जगन्नाथ राळेभात, विठ्ठलराव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, प्रा. अरूण वराट, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, सुधीर राळेभात,

रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सलीम बागवान, विनोद बेलेकर, सोमनाथ राळेभात, अँड. प्रवीण सानप, भरत काकडे, किसनराव ढवळे, मकरंद काशीद आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार विखे पा. म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० वर्षावरील नागरिकांना मोफत लस देत आहेत.

जगात मोफत लस देणारा भारत हा एकमेव देश आहे. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रत्येकाने घरोघर जाऊन त्यांना लसीचे महत्त्व सांगून लसीकरण करण्यास कटीबध्द करा. राज्यातील जेवढे खासदार आहेत

त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी केंद्र सरकारकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आणला आहे पण प्रसिद्धी केली नाही परंतु येथील आमदार हा निधी मीच आणला असे सोशल मिडियावर सांगत आहेत जे काम आपण केले नाही त्याचे श्रेय घेऊ नये याबाबत मी जनतेत जाऊन निधी आणल्याचे सांगणार आहे.

जिल्ह्यात ५० वर्षापासून विखे घराणे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे व संघर्ष करण्यासाठी साथ देत आहे. जर विखे घराणे राजकीयदृष्टय़ा संपले तर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही असे खा. विखे म्हणाले. तालुक्यात आ. रोहीत पवार हे दबावाचे व धाक दडपशाही चे राजकारण करीत आहेत. याची मला जाणीव आहे पण त्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे होते.

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आम्ही ते त्यांना दाखवून दिले आहे. त्यांनी मागील वर्षभरात एकही काम केले नाही माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन ते करीत आहेत. यापुढील काळात विखे गट हा भाजप म्हणून काम करील आपण सर्वजण भाजपचे कार्यकर्ते आहोत एकत्रितपणे काम करू असे खा. सुजय विखे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe