‘आ. रोहित पवार यांच्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा खेळखंडोबा’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षामुळे गेल्या दीड वर्षात कुकडी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे यांनी केला.

कर्जतसह दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त असणाऱ्या क्षेत्राला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतकरी देशोधडीला लागून

आर्थिक संकटात सापडून आत्महत्येची भाषा करीत असून माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी यांच्या काळात योग्य नियोजन करून नियमित कुकडीचे आवर्तन मिळवून दिले होते.

परंतु आता शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागा व पिके जळत असताना तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe