अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज नागरिकांचे जीव जात आहे. नागरिकांना पुरेश्या वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचण येत आहे.
ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन यासारख्या गोष्टी उपल्बध होत नसल्याने नागरिकांचा बळी जातो आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.
साईसंस्थानचा ऑक्सिजन प्रकल्प दोन दिवसात कार्यान्वित होणार असल्याची माहिती समोरच्या येत आहे. मसुरी येथील प्रशिक्षणाहून परतताच बगाटे यांनी या दोन्हीही प्रकल्पस्थानांना भेटी देऊन कामांना गती देण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या.
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पात हवेपासून ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पात रोज अडीचशे ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होईल. तीनशे बेडसाठी चोवीस तास हा ऑक्सिजन पुरेल.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन आठवड्यात सिमेंट फौंडेशनसह शेड तयार करून ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यात आला आहे.
कोविड तपासण्याचे अहवाल उशिरा मिळत असल्याने साईसंस्थान स्वत:च कोविडची आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा उभारत आहे.
प्रयोगशाळेची उभारणी युद्धपातळीवर सुरू असून येत्या आठवडाभरात या प्रयोगशाळेत तपासण्या सुरू होऊ शकतील. रोज एक हजार तपासण्या होतील व बारा तासांच्या आत अहवाल मिळू शकेल, असे बगाटे यांनी सांगितले.
- कींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|