कुक्कुटपालकांना ३.७६ लाख रुपयांची नुकसान भरपाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील कुक्कुटपालकांना ३ लाख ७६ हजार ४० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

तुकाराम ठाणगे यांना १ लाख ८० हजार, शिवाजी पायमोडे यांना १ लाख २० हजार, शैला हुलावळे यांना १ हजार ७१०, शांताबाई चेमटे यांना १ हजार १४०,

किसनाबाई चेमटे यांना १ हजार ८०० व विठाबाई चेमटे यांना १ हजार ८० रुपये मिळतील. बर्ड फ्लूचा वासुंदे येथील ८ हजार ९९४ कोंबड्यांना फटका बसला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe