नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- कृषिपंपाची वीजजोड तोडणी त्वरित थांबवावी तसेच पाथर्डी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील डांगेवाडी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे, सांगवी, या गावांतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी,

अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे व शिष्टमंडळाने तहसीलदार श्याम वाडकर यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशन काळात महाविकास आघाडी सरकारने वीजबिल थकबाकीदार वीजग्राहकांची विशेषत: व्यवसाय करणाऱ्याची वीज तोडणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

परंतू हे आश्वासन पाळले गेले नाही, अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे कर्मचारी गोरगरीब व्यावसायिकांना अरेरावी करत आहेत.

महावितरण कंपनीने कृषिपंपांची वीजतोडणी तत्काळ थांबवावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते महावितरण कंपनीच्या वसुली पथकास गावात फिरू देणार नाही.

तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रासपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे, उपाध्यक्ष नानाभाऊ पाडळकर, युवक अध्यक्ष अंकुश बोके, महेंद्र सोलाट यांच्या सह्या आहेत.

तहसीलदार श्याम वाडकर यांनी सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवून त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News