वाहदत ए इस्लामी कोविड केअर सेंटर ची सांगता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  वाहदत ए इस्लामी अहमदनगर व अहमदनगर मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने संचलित वाहदत ए इस्लामी कोविड केअर सेंटर मार्फत समर्पित रुग्णसेवा मिळाल्याने शहर आणि परिसरातील असंख्य कोरोना रुग्ण आजारातून मुक्त झाले या सेंटरची सांगता होत आहे

शहरातील नागरिकांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उत्कृष्ट समर्पित रुग्णसेवेचे बद्दल आभार मानले आहेत मे महिन्याच्या सुरुवातीपासून हे केंद्र वहदत ए इस्लामी या संघटनेने मुकुंद नगर येथील ईक्ररा स्कूलमध्ये सुरू केले होते शहरात जेव्हा रुग्ण संख्या उच्चांकी होती तेव्हा या केंद्रामार्फत रुग्णांना समर्पित रुग्णसेवा दिली गेली

केंद्रात एकूण 75 रुग्ण दाखल झाले होते त्यापैकी 38 महिला होत्या तर 37 पुरुष होते यात 48 रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती केंद्रात एकूण 250 ऑक्सीजन सिलेंडर वापरले गेले त्यापैकी 180 सिलेंडर रुग्णांना मोफत दिले गेले केंद्रामार्फत मोफत औषध व उपचार घेतलेले रुग्ण 28 होते तर कोरूना मुक्त होऊन घरी परतलेले

एकूण 43 रुग्ण होते कोरोणाची गंभीर 98 60 लागण झालेल्या 32 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या कामे रुग्णांना मदत करण्यात आली जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा झाला होता तेव्हा संघटनेचे कार्यकर्ते आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्णांच्या घरोघरी जाऊन आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांना ही सिलेंडर्स पुरवण्यासाठी अहोरात्र झटत होते

केंद्रात दाखल रुग्णांना दिलासा देऊन समुपदेशन करीत त्यांची देखभाल या केंद्रात करण्यात आली ज्याचा एच आर सी टी चा स्कोर 10 ते 20 पर्यंत होता असे 17 रुग्ण यशस्वी उपचार घेऊन याच केंद्रात बाहेर होऊन घरी परतले कुटुंबीयांनी अल्लाह व वाहदत ए इस्लामी कोविड केअर सेंटरचे आभार व्यक्त केले.

यावेळी इंजि.इलियास मोमीन, मुजिब पटेल, हाजी शौकत तंबोली, पत्रकार वहाब सय्यद, प्रा.अब्दुल कदिर सर, प्रा.नवेद बिजपुरे, प्रा.मुश्ताक सर, अँड.हफिज जहागीरदार, नूरमोहम्मद शेख या मान्यवरांस ह ,सामजिक कार्यकर्ते कासमभाई केबल वाले, नइम्ं सरदार,

वाहेद्त ए इस्लामी अहमदनगरचे स्वयंसेवक उपस्थीत होते या पत्रकार परिषदेचे प्र्रस्तावीक शाहरूख शेख यानी केले .स्वागत व आभार प्रा.अल्ताफ शेख यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe