एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेत कार्ले आणि गायकवाड प्रथम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर निबंध व पोस्टर स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

या निबंध स्पर्धेत किर्ती कार्ले तर पोस्टर स्पर्धेत मिलिंद गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. एड्स जनजागृतीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- निबंध स्पर्धा प्रथम- किर्ती कार्ले, द्वितीय- भक्ती काळे,

तृतीय- तन्मय गावखरे, उत्तेजनार्थ- ओमकार रोकडे, पोस्टर स्पर्धा प्रथम- मिलिंद गायकवाड, द्वितीय- तन्मय गावखरे, तृतीय- ऋतूजा गावखरे, उत्तेजनार्थ- भक्ती काळे. निबंध स्पर्धेचे परिक्षण प्रा.रंगनाथ सुंबे तर पोस्टर स्पर्धेचे परिक्षण उत्तम कांडेकर यांनी केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा.रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News