आ.लहु कानडेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळावर काँग्रेस कमेटीच्या वतीने आ.लहु कानडे यांच्या उपस्थितीत पेट्रोल डिझेल व जीवानावश्यक वस्तूंची भाव वाढ विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल,डिझेल,गँस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनताहैराण झाल्याने देवळाली प्रवरा येथील काँग्रेस कार्यकर्त्यानि एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला.

बैलगाडीमध्ये रॅली काढून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा अनोखा निषेध नोंदविला आंदोलकानी पोलीस उप निरीक्षक मधुकर शिंदे यांनी निवेदन देऊन आमच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याची मागणी केली

या आंदोलनात आ.लहू कानडे, युवा नेते करण ससाणे, सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण , शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे, नानासाहेब कदम, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कुणाल पाटील,

उत्तमराव कडू, कृष्णा मुसमाडे, दिपक पठारे, संजय पोटे, बाळासाहेब आढाव,दत्ताञय मुसमाडे,गंगाधर गायकवाड,शुभम पाटील,दगडू सरोदे,सुनिल कदम,जावेद शेख,कुमार भिंगारदे,जयेश माळी,गिताराम बर्डे,संजय भोसले,कारभारी होले आदी सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe