कलाकारांना दिलासा पुन्हा लाईट… कॅमेरा…आणि ऍक्शन होणार…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनलॉकबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात 5 टप्प्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच शुटींग सुरु होईल ही आशा मालिकांच्या दिग्दर्शकांना मिळाली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं होतं. यामुळे राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शुटींगवर बंदी आली होती. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या कित्येक मालिकांना शुटींगसाठी परराज्यात जावं लागलं होतं.

मात्र परराज्यात काही दिवस शुटींग केल्यानंतर तिथेही काही मालिकांवर बंदी आली होती. म्हणूनच कित्येक मालिकांचं शुटींग बंद होतं. त्यामुळे सर्वच कलाकार चिंतेत होते.

मात्र महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांत अनलॉकचा निर्णय घेतला आहे. यातील 2 ऱ्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपशहराचा समावेश आहे. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर शुटींगवरचे निर्बंधसुद्धा हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मालिकांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचं दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe