भाजपकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-सत्ता हातातून गेल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत.

विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न कमी आणि स्वतःचे प्रश्न जास्त उपस्थित करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहे.

भाजपचे हे वागणे लोकशाहीसाठी घातक आहे. पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो जणू तशीच अवस्था सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपची झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पटोले म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळून तब्बल एक किलोमीटर दूर अंतरावर होती. मात्र, भाजपचे नेते ती गाडी अंबानींच्या घराजवळ असल्याचे सांगत आहेत.

या गाडीत स्फोटके नव्हती तर त्या जिलेटिन कांड्या असल्याचे स्पष्ट झाले. याचा संबंध थेट नागपूरशी असल्याचेही चौकशीत समोर आले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंतोतंत स्क्रिप्ट वाचली.

यावरूनच याची पूर्वसूचना त्यांना असल्याचे स्पष्ट होते. मात्र, येनकेन प्रकारे मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र भाजपकडून होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News