वीजबिलाची थकबाकी भरण्यास ग्राहकांची ऑनलाईनला पसंती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राज्यात सध्या वीजबिल वसुली मोहीम जोरात सुरु आहे. अनेक थकबाकीदार वीजबिले जमा करू लागले आहे, तर ज्यांच्याकडून थकबाकी जमा केली जात नाही त्यांच्यावर महावितरणकडून कारवाई केली जात आहे.

दरम्यान ग्राहकांकडून वीजबिले जमा करण्याबाबत सकारत्मकता दर्शवली जात आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी आपल्या जवळील थकबाकी ऑनलाईन भरण्याला पसंती दिली.

जिल्ह्यातील 2 लाख ग्राहकांनी 38 कोटी रुपये ऑनलाईन पेमेंट महावितरणकडे जमा केली आहे. महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या लाईनमध्ये उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.

या सुविधेमुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढली आहे.

कोरोनाच्या काळात वीजबिल भरण्यासाठी रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ‘ऑनलाईन’ सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe