मैलामिश्रित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- एकीकडे जिल्ह्यावर कोरोनाचरे संकट असताना नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सूचना करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे प्रशासनाकडून नागरिकांना मैलामिश्रित पुरवठा होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापजनक भावना निर्माण झाली आहे.

दरम्यान शहरातील रेल्वे स्टेशन प्रभाग क्रमांक १५ मधील बोहरी चाळ, संभाजी वसाहत परिसरात नळाला मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असून, या भागातील पाणीपुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यासह नागरिकांनी दिला.

याबाबतचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हंटले आहे, की रेल्वे स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या निकामी झाल्या आहेत.

त्या पूर्णपणे सडल्या असून, त्याद्वारे ड्रेनेज लाइनचे पाणी जाते. मैलामिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली. परंतु, कार्यवाही झाली नाही. या भागात शुद्ध व उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गव्हाळे यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!