अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यास मारहाणीच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच परत प्रधानमंत्री ग्रामसडक
योजनेचे कनिष्ठ अभियंत्याच्या वाहनाला एका ठेकेदाराने त्याचे वाहन आडवे लावून अधिकाऱ्यास बाहेर ओढत गचांडी पकडून मारहाण केल्याचीघटना जामखेड तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता रविंद्र फकिरा संसारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे
की, दि.२३ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात करण्यात आलेल्या हळगाव ते आगी हळगाव ते गोयकरवाडी रोडचे कामाची पाहणी करुन
आमचे स्कॉर्पियो गाडी (एमएच १६ एन ०५५० या सरकारी वाहनाने हाळगाव ते ढवळेवस्ती रोडची पाहणी करण्यासाठी निघालो होतो. दरम्यान हळगाव बस स्थानक परिसरात ठेकेदार शरद शिवराम पवार याने आमच्या सरकारी गाडीला आडवे येवुन म्हणाला
की तुम्ही मला शिऊर ते बसरताडी रस्त्याचे केलेल्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत.
असे म्हणुन त्यांना शिवीगाळ करुन गाडीतुन बाहेर ओढुन त्यांची गचांडी धरुन चापटीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे जामखेड परिसरातील अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी पसार झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम