अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा विस्फोट !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यात शनिवार (दि. ३ एप्रिल) रोजी विक्रमी १७१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये १७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारी संगमनेरच्या शहरी भागात ५०, संगमनेर खुर्द येथे २, उंबरी- बाळापूर येथे १, आश्वी बुद्रुक येथे २, निमगावजाळी येथे १०, चिचंपूर येथे २, पानोडी येथे १, रहिमपूर येथे १, पिंप्री- लौकी येथे १, जोर्वे येथे २,

घुलेवाडी येथे ३२, पोखरी हवेली येथे १, तळेगाव दिघे येथे ४, वडगावपान येथे २, निमोण येथे ३, सुकेवाडी येथे ३, चंदनापूरी येथे १३, घारगाव येथे २, निमगाव टेंभी येथे १, सारोळे पठार येथे १, नादूंर खंदारमाळ येथे १, वनकुटे येथे १, मालदाड येथे १,

रायतेवाडी येथे १, डोळासणे येथे १, नादूंरी दुमाला येथे १, पिपळे येथे २, राजापूर येथे २, नान्नज दुमाला येथे १, चिचोंली गुरव येथे १, वडगाव लांडगा येथे १, जाखोरी येथे १, सावरगावतळ येथे २, जवळे बाळेश्वर येथे १, गुंजाळवाडी येथे ५, वेल्हाळे येथे ७,

वाघापूर येथे १, देवकौठे येथे २, निळवंडे येथे १, साकूर येथे १, मेढंवन येथे १, चिखली येथे १ व जवळे कडलग येथे १ असे एकून १७१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये शनिवारी १७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहे. नागरीकानी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News