अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. काल सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यात देखील रुग्ण संख्या चांगलीच वाढत आहे. जिल्ह्यातील कोपरगाव शहर व तालुक्यात आजच्या दिवशी १६ रुग्ण बाधित आढळलले.

file photo
यात नगर येथून आलेल्या अहवालात ८ तर खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत ८ असे १६ रुग्ण बाधित आढळले असून कोपरगाव शहरातील सह्याद्री कॉलनीतील एक ७० वर्षीय महिला व कान्हेगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३ हजार ११५ तर सक्रिय रुग्ण संख्या ८७,तर एकूण मृत्यू संख्या ४७ झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|