कोरोनाचे भांडवलीकरण; रुग्णवाहिका चालकांनी चालविला अंत्यविधीचा धंदा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचे संकट दाट होऊ लागले आहे. यातच अनेकजण सामाजिक भान बाळगत माणुसकीचे दर्शन घडवत कोरोना बाधितांच्या सेवेत रुजू आहे.

तर दुसरीकडं काही समाजकंटक कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे भांडवल करू लागले आहे. संगमनेरात चक्क करोना बाधित रुग्णाच्या अंत्यविधीचे पॅकेज घेण्यात येऊ लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील अमरधाममध्ये दररोज अंत्यविधी होताना दिसत आहे. करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयातील कर्मचारी या रुग्णावर अंत्यसंस्कार करतात.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या ताब्यात रुग्णाचा मृतदेह दिला जात नाही. नेमका याच संधीचा गैरफायदा संगमनेर शहरात घेतला जात आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह स्मशानभूमी पर्यंत पोहोचविला जातो.

शहरातील अनेक रुग्णवाहिका चालकांनी व मालकांनी याचा गैरफायदा घेण्याचे काम सुरू केले आहे. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित डॉक्टर लगेच रुग्णवाहिकेला पाचारण करतात.

रुग्णालयापासून स्मशानभूमी पर्यंत मृत व्यक्तीस घेऊन जाण्याचा दर पूर्वी किरकोळ स्वरूपात टाकला जायचा आता या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे.

अनेक रुग्णवाहिका चालक अंत्यविधीसाठी एका मृत व्यक्ती मागे पाच ते सहा हजार रुपयांचे पॅकेज हे रुग्णवाहिका चालक घेताना दिसत आहे.

हा धंदा आपल्यालाच मिळावा यासाठी काही रुग्णवाहिका चालकांनी डॉक्टरांशी संधान साधून आर्थिक कमाई सुरू केली आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र हा धंदा सुरु झाला आहे. यामुळे यांच्यावर काही कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News