कोरोनामुळे फळ विक्रेत्यांवर ओढावले आर्थिक संकट; कवडीमोल भावात विकतायत माल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनामुळे बळीराजावर गेल्या वर्षभरापासून आर्थिक संकट ओढवत आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात शासनाने अनेक कठोर निर्बंध घालून दिलेले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकवलेला माल बाजारात विक्रीस नेण्यास अडचणी येत आहे. यामुळे बळीराजा मोठा हतबल झाला आहे. कोरोनाचा फटका जवळपास सर्वच व्यवसायांना बसला आहे. यातून शेती व्यवसायहीदेखील सुटू शकलेला नाही.

लॉकडाऊनमुळे फळ विक्रीला चांगलाच ब्रेक लागला आहे. सध्या खरबूज उत्पादक मोठ्या कष्टाने पिकविलेल्या फळाला भाव मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. विक्रीतून उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

उन्हाळ्यात खरबूज, टरबूज या पिकांना मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी मोठ्या आशेने या पिकांची लागवड करतात.मात्र लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आठवडे बाजार तसेच बाजार समितीत नेऊन विकता येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात माळ खरेदी करतायत व्यापारी साधारणत:- ४० रुपये प्रतिकिलो भाव असणारे खरबूज सध्या १० ते १२ रुपये किलो या मातीमोल भावाने द्यावी लागत आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात भाजीपाला तसेच खरबूज, टरबूज आदींची खरेदी करून व्यापारी शहरात दामदुप्पट दराने विक्री करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe