अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-अवतार मेहेरबाबा ट्रस्टची महिला कामगार कोरोनाने मयत झाली असता तीच्या मुलीस मेहेरबाबा ट्रस्ट व कामगारांनी एक दिवसाचा पगार देऊन सुमारे दोन लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्रीधर केळकर, ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले, लालबावटा जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अॅड.कॉ. सुभाष लांडे, सचिव सुधीर टोकेकर, युनियनचे युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे,
पोपट शिंदे, सुनिल काळभोर आदिंसह कामगार वर्ग उपस्थित होते. अवतार मेहेरबाबा ट्रस्टची कर्मचारी संगीता शंकर नागजे कोरोनाने 28 एप्रिल रोजी मयत झाल्या. त्या लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या.
त्यांना एक मुलगी असून, या मुलीच्या भविष्याचा विचार करता ट्रस्ट व कामगार युनियनने मदतीचा हात पुढे केला.
युनियनसह इतर कामगारांनी आपला एक दिवसाचा पगार 73 हजार 348 रुपये तर ट्रस्टने 1 लाख 26 हजार 652 रुपये एकूण दोन लाख रुपयाचा मदत निधी नागजे यांच्या मुलीसाठी जमविण्यात आला.
या मदतीचा धनादेश ट्रस्टचे व युनियनचे पदाधिकारी यांच्या हस्ते मयताच्या मुलीस प्रदान करण्यात आला. ट्रस्टचे चेअरमन श्रीधर केळकर म्हणाले की, ट्रस्टने कोरोना काळात मोठी काळजी घेतली होती.
तरी देखील एका महिलेला कोरोनाची बाधा होऊन तीचा दुर्देवी मृत्यू झाला. या दु:खात सर्व विश्वस्त सहभागी असून, त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेश जंगले यांनी कर्मचारीप्रती आपुलकी व सहानूभुती ठेऊन त्यांना सर्व सुविधा व लाभ देण्यात येत आहे. मयत झालेल्या नागजे यांना ग्रॅज्युटीची रक्कमही देण्यात आलेली असल्याचे स्पष्ट केले.
अॅड.कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, सर्व कामगार एकाच कुटुंबातील सदस्य असून, संकट काळात मालक व कामगार एकत्र आल्याने एकमेकांना आधार होतो. ट्रस्टने देखील मनाचा मोठेपणा दाखवून एका कामगारप्रती दाखवलेल्या आस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी मयत नागजे यांच्या मुलीस या पैश्यातून भविष्यात आधार होणार आहे. कामगार व विश्वस्त तीच्या मागे उभे राहिल्याने तील एकप्रकारे जीवनात बळ मिळाले आहे.
तीच्या मुलीस पेन्शन मिळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सतीश पवार यांनी केले. आभार संजय कांबळे यांनी मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम