अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-घरी राहा, घरूनच काम करा, आरोग्यविषयक सूचनांचे पालन करा, पात्र असाल तर कोविड लस घ्या आिण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून स्वतःचा बचाव करा, अशी चतुःसूत्री आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्यास सांगितले आहे, याबाबत कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी यू. बी. प्रवीण राव यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेलवर ही सूचना केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करा’ या शीर्षकाचा ई-मेल प्रत्येक कर्मचाऱ्याला राव यांनी पाठवला आहे. यात राव यांनी देशात सातत्याने वाढणाऱ्या करोना रुग्णांची दखल घेऊन चिंता प्रकट केली आहे.
प्रवीण राव यांनी म्हटले आहे की, तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. मास्कविना घराबाहेर पडू नका, सुरक्षित राहण्याची सवय लावून घ्या, गर्दीत जाणे टाळा तसेच बंदिस्त जागांमध्येही जाणे टाळा.
अगदी आवश्यक नसेल तर घराबाहेर जाणेही टाळा, असा सल्ला राव यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. कर्मचाऱ्यांनी ते वयानुसार पात्र असतील तर लसीकरण करून घ्यावे. असे लसीकरण स्वेच्छेने करायचे असले तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे गरजेचे आहे.
व्यवसाय सातत्य आराखडा (बीसीपी) चमूचा भाग नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे, अशी सूचना करतानाच ही सूचना इन्फोसिसच्या सर्व शाखांना लागू असल्याचेही राव यांनी नमूद केले आहे.
अत्यावश्यक कामांचा निपटारा करण्यासाठी कार्यालयात येणे गरजेचे असल्यास सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच यावे.
तसेच बीसीपी चमूतील कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काम करताना कर्मचारी निगा केंद्रांत किंवा वसतिगृहांतच राहावे, घरी जाऊ नये असेही राव यांनी सुचवले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|