अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- राहाता तालुक्यातील करोना बाधीत रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नसून त्यात वाढच होत आहे. तालुक्यात गेल्या 24 तासात पुन्हा 77 रूग्ण करोना बाधीत सापडले असून सर्वाधिक रूग्ण शिर्डी, लोणी व राहाता शहरात सापडत आहेत.
तालुक्यात काल दिवसभरात 77 रूग्ण पॉझीटीव्ह निघाले असून त्यात शिर्डीत 14, राहाता 10, लोणी बु. 8, लोणी खु. 9, कोल्हार 4, कोर्हाळे 4, निर्मळ पिंप्री 4, सावळीविहीर बु. व खु. 3 रूग्ण सापडले आहे.
आठवडे बाजार बंद ठेवूनही रूग्ण वाढ थांबताना दिसत नसून करोना चाचणी वाढविण्याची गरज असल्याचे नागरिक मागणी करत आहे.
सध्या ज्या गावात रूग्ण सापडतात ते स्वतः जाऊन करोना तपासणी करून घेतात याची कोणतीही माहिती संबंधित यंत्रणेकडे नसल्याने नागरीक बेफीकीर राहत आहे.
करोना रूग्ण निघालेला परिसर सिल करण्याची गरज असून बाधीत रूग्णांची माहिती तातडीने संबंधित ग्रामपंचायत व नगरपालीका यांना देऊन त्या परिसरातील नागरिकांमधे जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|