अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारला राज्यातील मंदिरे उघडण्याचा अल्टीमेटम दिला आहे.
भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी संगमनेर येथे बोलताना मंदिरे बंद ठेवण्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी संगमनेर भाजप शहर अध्यक्ष , तालुकाध्यक्ष ,आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी यावेळी बोलताना मंदिरे उघडल्यावर कोरोना वाढतो मग दारूची दुकानं उघडली तर कोरोना जातो का? असा सवाल उपस्थित केला. ठाकरे सरकार सर्व क्षेत्रांमध्ये अपयशी ठरत आहे
अस सांगताना भोसले म्हणाले की, जनतेच्या भावनेचा आदर करत करत ठाकरे सरकारने सोमवार पर्यंत मंदिर उघडली पाहिजे अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला. कोण आहेत तुषार भोसले? तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडचे प्रमुख आहेत.
आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही वाद झाला होता. तसेच तुषार भोसले यांचं खरं नाव तुषार शालीग्राम पितांबर असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या.
त्यांनी वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज यांच्याकडे वेदांचे शिक्षण घेतले आहे. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील भारतीय विद्याभवनमधून घेतले आहे. वयाच्या 17व्या वर्षी अखंड 365 दिवस प्रवचन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम