अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 4 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यानंतर 4 ते 13 फेब्रुवारी दरम्यान पॅरालिम्पिक स्पर्धा होणार आहेत.
मात्र या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे रिपोर्ट्स पॉसिटीव्ह येत असल्याने ब्रिटन, अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी या स्पर्धांवर राजनैतिक बहिष्कार टाकला आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या 3 हजार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपैकी 106 जणांचा कोरोना अहवाल पॉजिटिव आला आहे.
नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, चीनची राजधानी बीजिंगमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट संसर्गाची 14 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
चीनमध्ये येत्या 4 फेब्रुवारीपासून हिवाळी ऑलिम्पिक सुरू होणार आहे. पण त्याच वेळी कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे.
कोविड-19 मुळे, गुरुवारी होणार्या हिवाळी ऑलिम्पिकमधील 3 गेम्स व्हिलेजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
यामुळे खेळाडूंनासाठी चिंतेचे वातावरण आहे. दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशातच बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यात अचानक प्रशासनाने एक संदेश जारी करून 20 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम