देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंतच कोरोना संसर्ग

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना संसर्गाची मोठ्या प्रमाणात संख्या असूनही देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंत संसर्ग मर्यादित ठेवता आला.

यासाठी देशातील डॉक्टर, नर्स त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेेल्या श्रमाशिवाय हे शक्य नव्हते, असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, इतर देशांमध्ये कोरोनाबाधित लोकसंख्येचा आकडा बराच मोठा आहे.

परंतु, आपल्याकडे तो कमी ठेवण्यात भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाशी आपण चांगला लढा देत आहोत. या महामारीला सामोरे जाण्यासाठी देशात विविध उपाय योजले गेले त्यामुळे मोठी लोकसंख्या कोरोना संसर्गापासून बचावली.

मात्र, काही लोकांनी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने राष्ट्रीय सेरो सर्व्हेच्या निकालाकडे दुर्लक्ष केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की देशातील सुमारे 20 टक्के लोक कोरोना संसर्गाने बाधित झाले आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ इंडियानं केलेल्या सर्वेक्षणानुसार असे म्हटले गेले होते की, देशातील 21.4 टक्के तरुणांना गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, देशात एकाच दिवशी कोविड-19 च्या संसर्गामुळं आणखीन 4,529 रुग्णांचा मृत्यू झाला.

या नवीन मृतांच्या संख्येसह देशात आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या वाढून ती 2,83,248 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या हेल्श बुलेटीननुसार एका दिवसात कोविड-19 चे 2,67,334 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 2,54,96,330 इतकी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News