जिल्ह्यासह गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढू लागले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील वेगाने केले जात आहे. मात्र दरदिवशी वाढती आकडेवारी पाहून प्रशासनासह नागरिक देखील भांबावले आहे.

नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणीत एक तर खासगी प्रयोगशाळेतील चाचणीत 19 रुग्ण कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांमधूनही आता करोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात मालुंजा येथे दहावीची विद्यार्थिनी कोरोना बाधीत असल्याचे आढळून आली होती. त्यानंतर स्थानिक शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी सात दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी होणारी आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये, विवाह समारंभ, आंदोलने या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe