शहरातील या महत्वपूर्ण सरकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. याला रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे.

यातच शहरातील एक महत्वाचे सरकारी कार्यालय कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. जिल्हा परिषदेत सहा महिन्यांनंतर पुन्हा करोनाचा शिरकाव झालेला आहे. याठिकाणी कार्यरत असणार्‍या एका विभागातील अधिकारी तर दुसर्‍या दोन विभागातील चार कर्मचार्‍यांचे करोनाचे अहवाल बाधित आढळून आलेले आहेत.

आधीच जिल्हा परिषदेच्या दोन सदस्य, एक अधिकारी आणि काही कर्मचार्‍यांचा करोनामध्ये बळी गेला असून त्यात पुन्हा करोनाचा याठिकाणी शिरकाव झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात करोना प्रभाव वाढत आहे.

त्यात 21 तारखेला एमपीएसपीची परीक्षा होणार असून त्यापार्श्वभूमीवर परीक्षेत पर्यवेक्षण करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची करोना चाचणी करण्यात येत आहे.

याचाचणी दरम्यान जिल्हा परिषदेत नव्याने पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. करोना बाधितांमध्ये एका विभागाचे प्रमुख अधिकारी यासह अन्य चार कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

दरम्यान आज काही कर्मचार्‍यांच्या चाचणीचे अहवाल येणार असून त्यात आणखी किती बाधित आढळणार याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe