अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव,परिसरामध्ये भितीचे वातावरण !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-आश्वी बु परिसरामध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. काल निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील तपासणी अतंर्गत दिवसभरात जवळपास ९ रूग्ण सापडले आहे.

यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव पुन्हा सुरू झाला आहे.

नागरीक, व्यापारी कोरोनाचे कुठलेही नियम पाळत नसल्याचा प्रत्यय येथील आठवडे बाजारामध्ये दिसून आला. सोशल डिस्टिंन्सिंगचाही पुर्णता फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.

सकाळी सुरू झालेल्या मोढा बाजारामध्ये अनेक शेतकरी तसेच व्यापारी यांनी सामाजिक अंतर तसेच मास्क न लावल्याचे दिसले. तर काहींनी केवळ औपचारीकता म्हणून तोंडाच्या खाली मास्क लावला होता.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे,नेहमी मास्क वापरणे तसेच वारंवार साबणाने हात धुणे गरजेचे आहे,असे निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी तय्यब तांबोळी यांनी सांगितले.

तसेच दुस-या टप्यातील ६० पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि ४५ पेक्षा जास्त वयाच्या सहव्याधी असणाऱ्या लोकांना १३०० हून अधिक लोकांना कोरोना लस दिली आहे.

पुणे स्थित सिरम इन्सिट्युटच्या कोव्हीशिड लस निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असून आठवड्यातील तीन दिवस सोमवार, बुधवार,

शुक्रवार ही लस कुठलेही पैसे न घेता दिली जात असल्याची माहीती डॉ.तांबोळी यांनी दिली.आश्वी परीसरातील रूग्ण संख्या पुढीलप्रमाणे- आश्वी बु ०४,निमगावजाळी०१,ओझर ०३ अशी आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News