अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक कठोर निर्णय घेतले आहे. यातच आता विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशा बेजबाबदारांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकतेच नेवासा तालुक्यातील सोनईतील बसस्थानक, डाॅ. आंबेडकर चौक भागात प्रशासनाने रस्त्यावर उगाच फिरणा-या ५६ जणांना ताब्यात घेवून सर्वांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी केली. या तपासणीत पाच व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह सापडले.
या सर्वांना शनैश्वर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी सोनईचे सरपंच धनंजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे व पोलिसांनी मुख्य रस्त्यावर तळ ठोकून दुचाकीवर कारण नसताना फिरत असलेल्या व्यक्तींची अॅन्टीजेन तपासणी केली.
ही मोहीम सुरू होताच अन्य रस्त्यावरील गर्दी काही क्षणात गायब झाली. पोलिसांनी विचारणा केल्यावर अनेकांनी खुप महत्वाच्या कामासाठी चाललो, औषधे आणायला चाललो, रुग्णाकडे चाललो असे कारण सांगत सुटण्याचा प्रयत्न केला.
पाॅझिटिव्ह व्यक्ती रस्त्यावर फिरत असल्याने गंभीर स्थिती होवू शकते.यापुढे तपासणीचा वेग वाढवून काळजी घेतली जाणार आहे. ही मोहिम यापुढेही सुरू ठेवण्यात येईल. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम