अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- विदेशातील आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे नव्हे, तर नागरिक मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग न पाळत नाहीत,नागरिकांचा हा हलगर्जीपणाच देशातील कोरोनाची रूग्णसंख्या वाढवत आहे,असे मत सीएसआइआर-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक राकेश मिश्र यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी करोना रुग्णांची आकडेवारी जारी केली. देशात शनिवारी २४ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले होते. तर आज रविरारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत नवीन रुग्णंसख्येने २५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
२० डिसेंबरनंतरचा हा मोठा आकडा आहे. २० डिसेंबरला २६ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवडाभरात करोना रुग्ण वाढीची टक्केवारी पाहता ही ६७ टक्क्यांहून अधिक आहे. फेब्रुवारीत ११ फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात दैनंदीन १०,९८८ नवीन रुग्ण आढळून येत होते.
पण गेल्या बुधवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार आठवड्याची नवीन रुग्णांच्या संख्या वाढून ६७ टक्क्यांपर्यंत गेली आहे. भारतात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना संसर्गाची नवीन रुग्ण हे दिवसाला १० हजाराच्या आसपास होते. भारत करोनावर मात करणार असं जगाला वाटत होतं.
कारण नागरिक दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत होते. पण आता नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने रुग्णवाढ होत आहे, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|