देशात कोरोनाचा उद्रेक प्रत्येक तासात होत आहे दीडशे रुग्णांचे मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे.

दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात फक्त गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. १० दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe