अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशभरात बुधवारी तीन लाख १५ हजार ६६० नवे रुग्ण नोंदवले गेले. हा जागतिक पातळीवरचा एक दिवसातील रुग्णवाढीचा उच्चांक आहे.
कोरोनामुळे २०९१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एका दिवशी नवी रुग्णवाढ एका लाखाच्या पुढे गेली नव्हती.
कोणत्याही देशात एकाच दिवसात इतकी रुग्णवाढ नोंदवण्यात आलेली नाही. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ५९ लाख, २४ हजार ९१४ झाली आहे.
तर एकूण मृत्यूंची संख्या एक लाख ८४ हजार ६६२ इतकी नोंदवण्यात आली. राज्यातही बुधवारी एक दिवसातील मृत्यूसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला.
राज्यात आजपासून कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यानंतर रुग्णसंख्या किती कमी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात काल ६७ हजार ४६८ नव्या रुग्णांची नोंद, तर ५६८ जणांचा मृ्त्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ काल उत्तर प्रदेशातही ३३ हजार २१४ व दिल्लीत २४ हजार ६३८ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली.
दिल्लीत काल २४९, तर उत्तर प्रदेशात १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी १६ लाख ३९ हजार ३५७ जणांच्या स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. एकाच दिवसाचा नमुने तपासण्यांचा हाही उच्चांक आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|