अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-राहाता तालुक्यातील शिर्डी हे जागतिक देवस्थान आहे. साईबाबांची कर्मभूमी आहे. जगभरातील भक्तांची साईबाबांवर श्रध्दा आहे.
या भक्तांनी साईचरणी केलेल्या दान रकमेतून साई संस्थान चालते. संस्थान माध्यमातून अन्नछत्र, भक्तनिवास, शिक्षण संस्था, साईबाबा हाॅस्पिटल, चालवले जाते. साई संस्थान कोरोना आजारात नागरिकांसाठी करत असलेल्या
कोविड सेंटरचे कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन कोल्हार येथील काँग्रेसचे नेते बाळासाहेब खर्डे यांनी दिली. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खर्डे यांनी म्हटले आहे की, आज राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.
अनेक नागरिक कोरोनाचे बळी ठरत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोरोनावर मात करण्यासाठी कार्य करत आहे.नगर जिल्ह्यातही कोरोनोच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झालेली आहे.
यावर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी जिल्हातील प्रशासकीय आधिकारी यांची जिल्हाधीकारी कार्यालयात बैठक घेऊन उपाययोजनेबाबत खबरदारी घेण्याबाबत प्रशासनाला सुचना ही दिलेल्या आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर तालुक्यात स्वतः जिल्हाधिकारी त्या-त्या तालुक्यातील प्रशासकीय आधिकारी यांची बैठक घेवुन तालुकानिहाय कोरोना परिस्थिती समजू घेऊन योग्य त्या उपाययोजनेबाबत सूचना दिलेल्या आहेत.
त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरू आहे. साईबाबा संस्थान मार्फत मोठे कोविड सेंटर होवु शकते. जिल्हातील अजुबाजुचे रुग्ण देखील येथे उपचार घेवु शकतात असे मत व्यक्त केले. ते अतिशय बरोबर असुन साईबाबा हे फक्त शिर्डी किंवा शिर्डी मतदारसंघापुरते मर्यादीत नाही.
साईचे भक्त जगात आहे. आणि त्याच्या दानधर्मावर संस्थान चालते हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. कोणीही या कोरोना महामारीत राजकारण करू नये आणि राजकारण करणे हे निषेधार्ह आहे, असेही खर्डे यांनी म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|