श्रीगोंदा शहरातील एका डॉक्टरच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच आज शहरातील एका नामांकित डॉक्टर कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत असून,तालुक्यात सुमारे ५० च्या आसपास रुग्ण असतानाच आता शहरातील एका नामांकित डॉक्टरांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना कोरोणाची लागण झाली आहे.

त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगीतले. डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच

शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या डॉक्टरांकडे उपचाराकरिता शहरासह तालुक्यातून शेकडो पेशंट उपचाराकरिता दररोज येत असतात.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe