कोरोनाने घेतला आणखी एका अभिनेत्याचा बळी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. मूळ वर्धा जिल्ह्यातील असलेले वीरा साथीदार हे नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले.

घरी अठरा विश्व गरिबी होती. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वे स्थानकावर हमाली, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता.

ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली होती. विविध ठिकाणी ते मार्गदर्शनपर व्याख्याने द्यायचे.

‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.

चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला होता.

न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe