कोरोनाने हिरावून घेतला सहा जणांचा श्वास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून दरदिवशी हजारांच्या संख्येने जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर देखील वाढला आहे.

यातच कोपरगाव तालुक्यात गेल्या 24 तासात कोरोनाने सहा जणांचा श्वास हिरावून घेतला आहे. त्यातच तालुक्यात काल मंगळवारी रोजी 196 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

या सहा जणांचा मृत्यू कोपरगाव येथील 46 व 75 वर्षीय पुरुष, तर सवंत्सर येथील 76 वर्षीय पुरुष, स्वामी समर्थ नगर येथील 64 वर्षीय महिला, सुरेगाव येथील 58 वर्षीय पुरुष, जेऊर पाटोदा येथील 46 वर्षीय पुरुष या सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती कोपरगाव तालुक्यात 27 एप्रिल पर्यंत 8 हजार 381 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून सहा हजार 276 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1077 सक्रिय अक्टिव पेशंट आहे. तसेच आतापर्यंत 31 हजार 629 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 122 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe