कोरोनाने घेतला मनपाच्या इतक्या कर्मचाऱ्यांचा बळी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  मात्र या दरम्यान फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस आदीसह इतर कर्मचाऱ्यांचा देखील यात बळी गेला आहे.

येथील महापालिकेच्या विविध विभागातील अनेक महिला-पुरूष कर्मचार्‍यांना करोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. यामुळे या काळात मनपाच्या मनपाच्या १९ कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची पहिली लाट आली.

तेव्हापासून महापालिकेचे अनेक  कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर म्हणून राबत आहेत. दरम्यान हे काम करत असतानाच अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.  फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली यात  संसर्गाचे प्रमाण वाढले, तसेच मृत्यूच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

संसर्ग झपाट्याने वाढत असताना वेळेवर उपचार न मिळाल्यानेअनेकांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या घनकचरा, मलेरिया, पाणी पुरवठा, नगरसचिव, प्राथमिक आरोग्य केंद्र,

संगणक, बांधकाम अशा विविध विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाला होता. यातील एकूण १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe