कोरोना अपडेट्स : राज्यात एकाच दिवसात आजवरची सर्वात मोठी वाढ ! मृत्यूचा आकडाही चिंताजनक ..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 8 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.

सध्या राज्यातील मृत्यू दर १.७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ९८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच, राज्यात आज रोजी एकूण ५,६५,५८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान आज ३४ हजार ००८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २७,८२,१६१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.६५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात काही दिवसांत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.यासाठी मुख्यमंत्री वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेत असून लॉकडाऊनची रुपरेषा ठरविण्यात व्यस्त आहेत.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आजची नवीन कोरोनाबाधितांची संख्या भयावह आहे. राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने 63000 चा पल्ला पार केला आहे.

राज्यातील एकूण मृतांचा आकडा 57,987 झाला असून आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२१,१४,३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,०७,२४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३१,७५,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe