नगर शहरात कोरोना लसीकरणाची उपकेंद्र जाहीर; जाणून घ्या ठिकाणे

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  मनपा आयुक्तांनी नगर शहरात २० ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. पावसाळ्याचे दिवस पाहता लसीकरण मोहिमेत व्यत्यय येवू नये यासाठी १९ मंगलकार्यालयात लस टोचणी शनिवार (दि.२९मे) पासून सुरू झाली आहे.

नगर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि आगामी पावसाळा हंगाम विचारात घेता लसीकरण सुलभतेने आणि विना अडथळा सुरू असणे गरजेचे आहे.

कोरोनाची तिसऱ्या लाटेची बाधा होण्यापूर्वीच लसीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त शंकर गोरे यांनी नगर शहरातील नागरी आरोग्य केंद्रातंर्गत लसीकरणाची उपकेंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेत तसे आदेशही दिले आहे.

या ठिकाणी होणार लसीकरण – शुभ मंगल कार्यालय (सावेडी नाका), गुरूदत्त लॉन्स (भूतकरवाडी,बालिकाश्रम रोड) मुकुंदनगर केंद्र- गंगा लॉन्स (निर्मलनगर परिसर), एनएम गार्डन (मुकुंदनगर) बोल्हेगाव केंद्र- संजोग लॉन्स (मनमाड रोड परिसर),

बचत भवन(बोल्हेगाव) मराठा मंगल कार्यालय (मध्य शहर) तोफखाना आरोग्य केंद्र- पोलीस लॉन्स (मध्य शहर), कोंडाजी मामा मंगल कार्यालय (मध्य शहर) एस.टी.महाले मंगल कार्यालय (मध्य शहर), लोणारी मंगल कार्यालय (मध्य शहर) सावेड उपकेंद्र- सिंधी हॉल (तारकपूर), आम्रपाली गार्डन (गुलमोहर रोड),

केडगाव – निशा लॉन्स, भाग्योदय मंगल कार्यालय (संपूर्ण केडगाव) जिजामाता आरोग्य केंद्र- ओम गार्डन (रेल्वेस्टेशन), अंकुर लॉन्स (चाणक्य चौक, भोसले आखाडा) इंद्रप्रस्थ लॉन्स (सारसनगर, महात्मा फुले चौक), हमाल पंचायत भवन (मार्केट यार्ड परिसर) शिवपवन मंगल कार्यालय (नालेगाव, कल्याण रोड),

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe