अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशाच राजस्थानमधील एका सरकारी रुग्णालयातून कोरोना लसीचीच चोरी झाल्याचे समोर आले आहे. देशात लस चोरीची ही पहिलीच घटना आहे.
जयपूरच्या शास्त्रीनगर परिसरातील हरिबक्श कावंटिया सरकारी रुग्णालयातून ही चोरी झाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातून कोव्हॅक्सिन लसीच्या ३२ बाटल्या चोरीला गेल्या आहेत.
एका बाटलीत १० डोस असतात. त्यानुसार कोरोना लसीचे ३२० डोस चोरीला गेले आहेत. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.
मात्र बुधवारी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तपास केला.
मात्र रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही बंद आढळले. रुग्णालयाचे अधीक्षकदेखील आपल्या पातळीवर तपास करत आहेत.
नोंदीनुसार रुग्णालयाला ४८९ डोस देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ३२० डोस कमी आढळल्याचे अधीक्षकांनी सांगितले.
ही लस ठेवण्यात आलेल्या शीतगृहाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात असताना देखील डोस चोरीला गेलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|