अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही देशात पुणे शहर हॉटस्पॉट ठरले. पण, दोन्ही वेळी लाटेच्या तीव्रतेचा अंदाज प्रशासनाला आला नव्हता.
संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच पुण्यातील सांडपाण्यातही कोरोना विषाणूचे अंश आढळून आले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच आम्ही राज्य सरकारसमोर मांडणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी म्हटले आहे.
पाषणमधील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे. या अभ्यासात पुणे महापालिकेचाही सहभाग होता.
पुण्यातील विविध ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या सांडपाण्यामध्ये विषाणू आढळून आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर डिसेंबर २०२० पासून हा अभ्यास केला जात आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यासाठी या अभ्यास आणि संशोधनाचा उपयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम