पंच्यान्नव वर्षाच्या आजीबाईने हरवले कोरोनाला 8 स्कोअर असताना कोरोनावर मात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  पाईपलाइन रोड येथील शांताबाई पालवे या पंच्यान्नव वर्षाच्या आजीबाई नुकत्याच कोरोनातून मुक्त झाल्या. शेंडी (ता. नगर)

येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या निशुल्क प्रहार कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या शांताबाई व इतर तेरा रुग्णांना सोडण्यात आले.

या कोविड सेंटर मधून 85 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना फुले देऊन घरी पाठविण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष पप्पूशेठ येवले, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा सल्लागार प्रा.मालोजी शिकारे, डॉ. धनंजय गुंड (पारगावकर), रुग्णसेविका दिपाली पाटील आदी उपस्थित होते.

पंधरा दिवसापुर्वी शांताबाई पालवे यांना कोरोना झाल्याचे समजले. त्यांचा एचआरसीटीचा अहवाल 8 होता. पुढे गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून शहरातील अनेक रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी धावपळ केली.

मात्र हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याचे त्यांना निराशा आली. त्यांच्या नातेवाईकांना प्रहार कोविड सेंटरची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्यांना सदरच्या कोविड सेंटरमध्ये हलवले. तेथे त्यांच्यावर डॉ. धनंजय गुंड (पारगावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळीच उपचार झाले.

पंधरा दिवसानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. पुर्ण बर्‍या होऊन घरी परतताना शांताबाईसह इतर रुग्णांनी डॉक्टर, परिचारिका व निशुल्क सेवा देणार्‍या प्रहारच्या पदाधिकार्‍यांचे अशूनयनांनी आभार मानले.

प्रहारचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अजय महाराज बारस्कर व राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार कोविड सेंटरचे कार्य सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe