अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- देशासह कोरोनाने अनेक मोठ्या शहरांमध्ये अक्षरशः थैमान घातलं आहे. अशात आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
दिल्लीत एम्समधील रुग्णालयातील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.
दरम्यान याआधी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चिंता वाढली आहे.
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिकांसह रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनाही कोरोनाची वेगाने लागण होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
अशातच कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतल्यानंतर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर आणि एम्समधील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डीएस राणा यांना तातडीने भेटायला बोलावले आहे.
मुख्यमंत्री रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांच्या स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे माहिती मिळत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|