अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी देण्यात आली आहे.
डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, 11 किंवा 12 मेपासून ही कोविड औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल.
त्यांनी सांगितले की सुरुवातीला किमान 10 हजार औषधाचे डोस बाजारात येऊ शकतात. क्लिनिकल चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या जलद रिकव्हरीसाठी मदत करते.
रुग्णाचे ऑक्सिजनवर निर्भर राहणे कमी होते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी हे औषध फायदेशीर ठरणार आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे.
हे आहे औषधाचे नाव ;- या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असे नाव देण्यात आले आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे.
यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे.
इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.
पावडर स्वरूपात मिळणार औषध :- DRDO ने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये मिळते, जे पाण्यात विरघळवून पिता येते.
हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|