अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-जिल्ह्यात आज ६६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ०९६ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७९९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५५ आणि अँटीजेन चाचणीत १७२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९४, अकोले ३९, जामखेड २५, कोपरगाव ४५, नगर ग्रामीण २४, नेवासा ०८, पारनेर २०, पाथर्डी १०, राहता ३४, राहुरी ०३, संगमनेर ३१, शेवगाव ४७, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३, अकोले २७, कर्जत ०३, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २२, नेवासा ०५, पारनेर १२, पाथर्डी ०१, राहाता ९३, राहुरी १५, संगमनेर ११६, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ५१, कॅन्टोन्मेंट ०७ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ४०, अकोले ०८, जामखेड १२, कर्जत १२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०५, नेवासा ११, पारनेर १४, पाथर्डी १९, राहाता १३, राहुरी ०८, संगमनेर ०१, शेवगाव १६, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३८, अकोले १६, जामखेड १२, कर्जत २२, कोपर गाव ३५, नगर ग्रामीण २६, नेवासा ३१, पारनेर १९, पाथर्डी ३१, राहाता ७७, राहुरी २७, संगमनेर ५७, शेवगाव १४, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १८ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:८२०९६
- उपचार सुरू असलेले रूग्ण:४७९९
- मृत्यू:११८९
- एकूण रूग्ण संख्या:८८०८४
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|