‘जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे होईल शक्य’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल यासाठी नागरिकांनीही नियमांचे पालन करुन या केंद्रातील सुविधांचा लाभ घेऊन आपले लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

मनपाच्या आरोग्य केंद्रवर लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दी कमी करण्याचा दृष्टीने महात्मा फुले आरोग्य केंद्राचे उपकेंद्र म्हणून शहराच्या मध्यवस्तीतील चाँद सुलताना हायस्कूल येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ नगरसेवक नज्जू पहिलवान यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता कावरे, विशाल वालकर, तारीक कुरेशी, आसीफ पटवेकर, वसिम शेख, गणेश आरे, दत्ता लक्षशेट्टी, रवी चवंडके, आनंद मुथा, गगन शिंदे, आकाश पटवेकर उपस्थित होते. नगरसेवक बोराटे म्हणाले,

कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्यावतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यात नागरिकांचे लसीकरणास प्राधान्य देऊन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्राणा काम करत आहे. मनपाच्यावतीनेही शहरातील विविध आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरु आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe