कोरोनाच्या दुसर्या लाटेत झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यासाठी नगर-औरंगाबाद रोड शेंडी (ता. नगर) येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या निशुल्क प्रहार कोविड सेंटरला राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी भेट देऊन सुरु असलेल्या रुग्णसेवेची पहाणी केली.
यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास येवले, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे, शिवसेना विभाग समन्वयक धनंजय जाधव,

तालुका दूध संघाचे अध्यक्ष उत्तम अमृते, मेजर सुनील परदेशी, श्रीराम शिंदे, दिपाली पाटील आदी उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू म्हणाले की, आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असून, प्रहारचे कोविड सेंटर गोर गरिबांना आधार ठरत आहे.
कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शंभर बेडची सुविधा असलेल्या विनामूल्य प्रहारच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचनी जाणून घेतल्या.
या संकटकाळात धैर्याने लढा देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर कोविड सेंटर मध्ये कार्यरत डॉक्टर परिचारिका व इतर रुग्ण सेवकांचे त्यांनी कौतुक केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|