नेवाश्यात कोरोनाच्या हाफ सेंच्युरी ; बाधितांच्या संख्या साडेतीन हजार पार

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नेवासा तालुक्यात गेल्या 24 तासात 25 गावातून तब्बल 52 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात अली आहे. यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 530 झाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या 28 दिवसांत अवघे 25 संक्रमित आढळले होते. फेब्रुवारी अखेर एकूण संक्रमितांची संख्या 2953 होती.

मार्च अखेरपर्यंत त्यात 577 बाधितांची भर पडल्याने आतापर्यंतची तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या 3530 वर गेली आहे.

दरम्यान कालच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे तालुक्यातील भेंडा बुद्रुकमध्ये 8 संक्रमित आढळले. कुकाण्यात 6 बाधित आढळले. पाचेगाव येथे 5 संक्रमित आढळून आले.

पाचेगावातील 5 बाधितांमधील तिघे गावातील तर दोघे कारवाडी भागातील आहेत. नेवासा शहरात चौघे बाधित आढळले. त्यातील एकजण नेवासा कारागृहातील आहे.

भेंडा खुर्द, जेऊरहैबती, लोहगाव, मुकिंदपूर, सौंदाळा, टोका, वडाळा बहिरोबा या 8 गावात प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

चांदा, गेवराई, जुने कायगाव, महालक्ष्मी हिवरे, माळीचिंचोरे, पाथरवाला, रांजणगाव, साईनाथनगर व सोनई या 9 गावांमधून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला.

तालुक्यात अशाप्रकारे एकूण 52 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3530 झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|