अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नार शहरासह ग्रावापातळीवर कोरोनाचरे संक्रमणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या सहा दिवसांत सुमारे 191 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 110 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
तर सध्या एकूण अंदाजे 100 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यातच भरात भर म्हणजे तालुक्यात गेल्या 24 तासात नव्याने 53 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
काल श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात 28, खासगी रुग्णालयांमध्ये 22 तर अँटीजेन चाचणी तपासणीत 03 असे 53 रुग्ण आढळून आले आहेत.
तर करोनाचे उपचार करुन एकूण 21 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|